आपण तर सध्या आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्याच अनेक क्षमता नष्ट करत चाललो आहोत…
आपण जसजसे ‘स्मार्ट’ होत गेलो, तसतशा या आपल्या क्षमता कमी होत चालल्या आहेत की काय, अशी शंका उत्पन्न होण्यासारखी परिस्थिती आहे. स्मार्ट फोन्सच्या रूपाने आज आपल्या हातात छोटासा संगणकच आला आहे. अगदी लहानसहान गोष्टींसाठी आपण त्याचा उपयोग करू लागलो आहोत. माणसाचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून, या तंत्रज्ञानाचा शोध लागला, पण त्याने आज आपल्यासमोर अनेक समस्या निर्माण केल्या आहेत.......